चिपळूण रेल्वे स्थानकावर पूरस्थिती हाताळण्यासाठी संयुक्त प्रात्यक्षिक सराव

0
26

आपत्कालीन सज्जतेची चाचणी

 चिपळूण प्रतिनिधी
पूरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी कोकण रेल्वेच्या वतीने चिपळूण रेल्वे स्थानकावर संयुक्त प्रात्यक्षिक सराव आयोजित करण्यात आला. या सरावातून विविध विभागांमधील समन्वय, आपत्कालीन प्रतिसाद क्षमता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीची तयारी यांची चाचणी घेण्यात आली.
या प्रात्यक्षिक सरावात रेल्वे सुरक्षा बल (RPF), शासकीय रेल्वे पोलीस (GRP), होमगार्ड, वैद्यकीय, वाणिज्यिक, यांत्रिक, अभियांत्रिकी तसेच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
सरावादरम्यान पूरस्थिती निर्माण झाल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढणे, तातडीने बचावकार्य सुरू करणे, वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे आणि विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय राखण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, अशा संयुक्त सरावांमुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद अधिक वेगवान आणि प्रभावी होण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here