चिवला समुद्रकिनारी ‘तारली’ माशांचा वर्षाव

0
5
चिवला समुद्रकिनारी ‘तारली’ माशांचा वर्षाव
चिवला समुद्रकिनारी ‘तारली’ माशांचा वर्षाव

चिवला समुद्रकिनारी ‘तारली’ माशांचा वर्षाव

पर्यटकांना लाभला अविस्मरणीय अनुभव

मालवण (प्रतिनिधी) : येथील Chivla Beach समुद्रकिनाऱ्यावर रविवारी रात्री पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात हजारोंच्या संख्येने ‘तारली’ मासे सापडल्याने अनोखे दृश्य पाहायला मिळाले.

नेहमीप्रमाणे मच्छिमारांनी समुद्रात रापण टाकली होती. मात्र ती किनाऱ्याकडे ओढताना जाळ्यात मोठ्या प्रमाणात तारली मासे अडकल्याचे लक्षात आले. किनाऱ्यावर रापण येताच जाळ्यातील चंदेरी मासे हवेत उड्या मारत असल्याचे विहंगम दृश्य पाहून उपस्थित पर्यटक आणि स्थानिक भारावून गेले.

या वेळी पर्यटकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल आणि कॅमेऱ्यात टिपण्यासाठी एकच गर्दी केली. काहींनी हाताशी मिळेल त्या पिशव्या व भांड्यांचा वापर करून मासे गोळा करण्याचाही प्रयत्न केला.

पारंपरिक रापण पद्धतीने होणारी अशी भरघोस मासेमारी आणि त्यातून निर्माण होणारे निसर्गरम्य दृश्य क्वचितच पाहायला मिळते. या घटनेमुळे चिवला किनाऱ्यावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here