चेंदवण श्रीदेवी माऊली विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल
कुडाळ l मनोज देसाई
चेंदवण श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल परंपरेप्रमाणे यंदाही १०० टक्के लागला असून विद्यालयाच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यावर्षी एकूण २० विद्यार्थी परीक्षेला बसले होते व सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर २ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यश संपादन केले.
या परीक्षेत कु.यश विलास पेडणेकर याने ९०.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. जनार्दन विजय बिडये याने ८४.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर भूमिका वामन भरडकर हिने ८३.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांकडून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


