चेंबूर पूर्वमध्ये ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’

0
8
चेंबूर पूर्वमध्ये ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’
चेंबूर पूर्वमध्ये ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’

चेंबूर पूर्वमध्ये ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’

मराठी-कोकणी उद्योजकांना मिळणार हक्काची बाजारपेठ

चेंबूर :
मराठी व कोकणी उद्योजकांना व्यवसायासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मिशन कोकण साम्राज्य’च्या वतीने चेंबूर पूर्व येथे ‘कोकणी बाजारपेठ’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ९ ऑक्टोबर ते रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा महोत्सव नागरिकांसाठी खुला राहणार आहे.
या बाजारपेठेत कोकणातील तसेच स्थानिक उद्योजकांची विविध उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. घरगुती खाद्यपदार्थ, दागिने, साड्या, विविध प्रकारचे कपडे, हस्तकला, भेटवस्तूंसाठीचे साहित्य आणि नैसर्गिक उत्पादनांसह अनेक वस्तूंची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
मराठी व कोकणी उद्योजकांना प्रोत्साहन देणे, नवोदित व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायाला व्यापक बाजारपेठ मिळवून देणे, हा ‘मिशन कोकण साम्राज्य’चा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमामुळे स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असून, मराठी व कोकणी व्यावसायिकांना एकत्र आणण्यासही मदत होणार आहे.
ही बाजारपेठ सोना लॉन, गोवंडी रोड सिग्नल, हॉटेल निलदुर्गसमोर, खारदेव नगर, चेंबूर पूर्व येथे भरविण्यात येणार आहे. बाजारपेठेची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ अशी आहे.
नागरिकांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह या कोकणी बाजारपेठेला भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक श्री. अजय आत्माराम यादव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here