चेंबूर मेट्रो स्टेशन लवकरच सेवेत; मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना

0
89

मुंबई : चेंबूर मेट्रो स्टेशन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, हे स्टेशन मुंबईतील महत्त्वाचे इंटरचेंज केंद्र म्हणून विकसित होत आहे. मुंबई मोनोरेलच्या पुनर्प्रारंभाच्या तयारीसोबतच एमएमआरडीए अखंडपणे जोडलेल्या शहरी वाहतूक नेटवर्कच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (आयएएस) यांनी आज एमएमएमओसीएलचे व्यवस्थापकीय संचालक कन्हूराज बागटे यांच्यासमवेत चेंबूर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. यावेळी त्यांनी जवळील व्ही. एन. पुरव मोनोरेल स्टेशनलाही भेट देत प्रणालीची सज्जता आणि मेट्रो-मोनोरेल आंतरजोडणीच्या सुविधांचा आढावा घेतला.
चेंबूर मेट्रो स्टेशन सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मेट्रो आणि मोनोरेलमधील प्रवास अधिक सुलभ होणार असून मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here