छेडा नगरमध्ये वार्षिक हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात; महापौर रितू तावडे यांची उपस्थिती

0
7

मुंबई : छेडा नगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या (CRWA) मैदानात, छेडा नगर, चेंबूर (पश्चिम) येथे आयोजित वार्षिक हळदी-कुंकू कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित राहिल्या. महाराष्ट्रीय संस्कृती आणि परंपरेचा अनमोल वारसा जपणाऱ्या या कार्यक्रमात महिला व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या प्रसंगी महापौर रितू तावडे यांनी उपस्थित बंधू-भगिनींशी संवाद साधला. पारंपरिक हळदी-कुंकू सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, आपुलकी आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा सुंदर अनुभव मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुंदर आणि नियोजनबद्ध आयोजनाबद्दल आयोजकांचे तसेच उपस्थित नागरिकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजातील परस्परसंवाद वाढण्यास आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here