जखमी अवस्थेत १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांची महापौर रितू तावडे यांनी घेतली भेट

0
11

३५ हजार फूट उंचीवर चाकूहल्ला
मुंबई :
दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानात ३० सप्टेंबर रोजी घडलेल्या जीवघेण्या प्रसंगात अतुलनीय शौर्य आणि संयम दाखवून तब्बल १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे, मूळ मुंबईकर असलेले कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी भेट घेतली.

मुंबईतील घाटकोपर (पूर्व) येथील ‘धवलगिरी’ इमारतीत वास्तव्यास असलेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे चुलते किशोर मच्छार यांच्या निवासस्थानी महापौर रितू तावडे यांनी भेट देत कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांनी कॅप्टन स्मित यांच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानात ३५ हजार फूट उंचीवर कॉकपिटमध्ये सह-वैमानिकाकडून झालेल्या कथित चाकूहल्ल्यात कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले होते. मात्र, रक्ताच्या थारोळ्यात असतानाही त्यांनी असीम संयम आणि धैर्य दाखवत विमानाचे नियंत्रण कायम ठेवले. विमानातील २७ निष्पाप बालकांसह १८० प्रवाशांचे प्राण सुरक्षित ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
विशेष म्हणजे, मच्छार कुटुंबीयांचे निवासस्थान ज्या प्रभागात येते, त्या प्रभाग क्रमांक १३२ चे प्रतिनिधित्व रितू तावडे यांनी नगरसेविका म्हणून केले आहे. आपल्या प्रभागातील या धाडसी सुपुत्राच्या कुटुंबीयांची भेट घेऊन संपूर्ण प्रभाग आणि मुंबईकरांच्या वतीने मच्छार कुटुंबीयांना पाठबळ देत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी घाटकोपर पूर्वचे आमदार परागभाई शाह, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका राखी जाधव यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here