‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत ससून रुग्णालयातील रुग्णांना मोफत अन्नदान

0
18

‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत ससून रुग्णालयातील रुग्णांना मोफत अन्नदान

पुणे, दि. १ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना दररोज मोफत जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ट्रस्टच्या या समाजोपयोगी उपक्रमांतर्गत दररोज सुमारे ३,००० रुग्णांना पौष्टिक व स्वच्छ भोजनाचे वाटप केले जाते. उपचारासाठी दूरदूरवरून येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना या अन्नदान सेवेचा मोठा आधार मिळत आहे.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ हा त्यापैकी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here