जय मल्हार ग्रुपचा आरती संग्रह गणेश भक्तांसाठी अनमोल ठेवा : जनार्दन हळदे

0
29
जय मल्हार ग्रुपचा आरती संग्रह गणेश भक्तांसाठी अनमोल ठेवा : जनार्दन हळदे
जय मल्हार ग्रुपचा आरती संग्रह गणेश भक्तांसाठी अनमोल ठेवा : जनार्दन हळदे

जय मल्हार ग्रुपचा आरती संग्रह गणेश भक्तांसाठी अनमोल ठेवा : जनार्दन हळदे

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
मुंबई :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय मल्हार ग्रुपच्या वतीने सलग १२व्या वर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या आरती संग्रहाचे मुंबई येथे उत्साहात प्रकाशन करण्यात आले. आकर्षक स्वरूपात आणि मोठ्या अक्षरांत मुद्रित करण्यात आलेल्या या संग्रहात विविध देवदेवतांच्या आरत्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा आरती संग्रह गणेश भक्तांसाठी अत्यंत उपयुक्त आणि अनमोल ठेवा असल्याचे प्रतिपादन प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी व जानव्ही रिअलटर्सचे चेअरमन श्री. जनार्दन हळदे यांनी केले.

यावेळी बोलताना जनार्दन हळदे यांनी जय मल्हार ग्रुपच्या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. समाजोपयोगी उपक्रमांची ही परंपरा यापुढेही अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करत ग्रुपच्या भविष्यातील सर्व उपक्रमांना आपले कायम सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
मान्यवरांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यास आर.के. एन्टरप्राईजचे चेअरमन श्री. रुपेश कोळंबे, सी.ए. सुशांत बारस्कर, वैभव साळवी, राज जाधव, स्वप्नील चाळके, रिल स्टार दत्ता गावडे तसेच ‘मी कोकणी’चे युट्युबर निखिल सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
१२ वर्षांची सामाजिक बांधिलकी
जय मल्हार ग्रुपने गेल्या १२ वर्षांपासून आरती संग्रह प्रकाशनाची अखंड परंपरा जपली आहे. धार्मिक उपक्रमांसोबतच दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा, शैक्षणिक साहित्याचे वाटप यांसह विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
जय मल्हार ग्रुपचा हा आरती संग्रह मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह कोल्हापूरपर्यंत पोहोचत असून, दरवर्षी गणेश भक्तांकडून या संग्रहाची आतुरतेने प्रतीक्षा केली जाते. धार्मिक श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची जोड देणाऱ्या जय मल्हार ग्रुपच्या या उपक्रमाचे भक्तगण आणि समाजातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here