जलसंपदा विभागाच्या ‘जलसिंधू’ निवासी संकुल प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

0
46
जलसंपदा विभागाच्या ‘जलसिंधू’ निवासी संकुल प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न
जलसंपदा विभागाच्या ‘जलसिंधू’ निवासी संकुल प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

जलसंपदा विभागाच्या ‘जलसिंधू’ निवासी संकुल प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक, सुरक्षित आणि सुसज्ज निवास व्यवस्था उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

सिंधुदुर्ग : जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ निवासी संकुल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या या निवासी संकुलामुळे जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक सुविधांनी युक्त, सुरक्षित आणि सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात गुणवत्ता वाढविणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, वसाहतीचा आराखडा उत्कृष्ट असून बांधकामाची गुणवत्ता सर्वोत्तम राखली गेली पाहिजे. त्याचबरोबर प्रकल्पाचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकल्प दीड वर्षाच्या आत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
या निवासी संकुलामुळे कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. परिणामी जलसंपदा विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळून नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देणे शक्य होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत Pramod Kamat, , जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (Trupti Dhodmise), उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर (Jagdish Katkar) , मुख्य अभियंता मिलिंद नाईक             ( Milind Naik)  , अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील (Padmakar Patil), कार्यकारी अभियंता अमोल चोपडे (Amol Chopde) , कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके (Harshada Walke) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जलसिंधू’ निवासी संकुल प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक निवास व्यवस्थेचा एक नवा आदर्श निर्माण होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here