जागतिक योगासन स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या रोहित चव्हाणची भारतीय संघात निवड

0
40

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र (योगासन), कोल्हापूर येथील खेळाडू Rohit Chavan याची ४ ते ८ जून २०२६ दरम्यान अहमदाबाद येथे होणाऱ्या पहिल्या जागतिक योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

World Yogasana Sports Championship 2026 ही स्पर्धा TransStadia Stadium येथे पार पडणार आहे. रोहितने यापूर्वी संगमनेर येथे झालेल्या सहाव्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत वरिष्ठ गटातील सुपाईन प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते.

या यशाच्या जोरावर त्याची हरियाणातील सोनीपत येथे झालेल्या निवड चाचणीत अंतिम निवड करण्यात आली. देशभरातील राष्ट्रीय आणि एशियन पदक विजेत्या खेळाडूंमधून त्याने भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

विशेष म्हणजे, कोल्हापूर जिल्ह्यातून वरिष्ठ गटात अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणारा रोहित हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याचे सराव शिबिर ९ मे ते २ जून दरम्यान अहमदाबाद येथील साई सेंटरमध्ये होणार आहे.

राज्य क्रीडा मार्गदर्शक योगासन प्रशिक्षक रविभूषण कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत असून, त्याच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here