जिल्हा परिषद ठाणे सेस योजना २०२६-२७ : शेतकऱ्यांसाठी विविध योजनांवर आकर्षक अनुदान
जिल्हा परिषद ठाणे सेस योजना २०२६-२७ : शेतकऱ्यांसाठी विविध योजनांवर आकर्षक अनुदान
सिंचन, सौरऊर्जा, आधुनिक शेती, सेंद्रिय शेतीसह विविध घटकांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
प्रतिनिधी
जिल्हा परिषद ठाणेच्या सेस योजना २०२६-२७ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजनांवर आकर्षक अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतीचे आधुनिकीकरण, उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत सिंचन साहित्य, सुधारित कृषी अवजारे, सौरऊर्जेवरील उपकरणे, पीक संरक्षण साहित्य, कृषी निविष्ठा, भाजीपाला व फुलशेती, सेंद्रिय शेती, मसाला पिके तसेच आधुनिक भात लागवड तंत्रज्ञानासाठी अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी पंचायत समिती किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून आवश्यक माहिती घ्यावी, तसेच ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.