जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाडा पुनर्वसनला मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची भेट
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाडा पुनर्वसनला मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची भेट
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाडा पुनर्वसन येथे भेट देऊन शाळेच्या विविध सुविधांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्यविषयक सुविधा तसेच शाळेतील इतर पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. शाळेतील वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शिक्षणाच्या दर्जाबाबतही त्यांनी माहिती घेतली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांनी अधिक प्रभावीपणे कार्य करावे आणि शाळेतून गुणवंत व आदर्श विद्यार्थी घडावेत, यासाठी संबंधित अधिकारी व शिक्षकांना आवश्यक सूचना गजानन पाटील यांनी दिल्या.
जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील शिक्षण अधिक सक्षम करणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.