जुलै २०२५ मधील नमुंमपा पदभरती परीक्षा ३० संवर्गाचे स्कोअर कार्ड महापालिका संकेतस्थळावर प्रसिध्द

0
23

नवी मुंबई
नवी मुंबई  महानगरपालिकेच्या जाहिरात क्र. आस्था /01/2025, दिनांक 27/03/2025 व शुध्दीपत्रक दि.29/04/2025 अन्वये प्रसिध्द केलेल्या पदभरती जाहिरातीमधील ३० संवर्गाचे स्कोअर – कार्ड (Score- Card) नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर दि.11/09/2026 रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पध्दतीने होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करणा-या भूलथापांना व आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये आणि याबाबत दक्ष राहून थेट स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी, असे सूचित करण्यात येत आहे.

भरतीविषयक अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here