जेट इंधन दरवाढीचा परिणाम; एअर इंडियाकडून इंधन अधिभारात बदल

0
10
जेट इंधन दरवाढीचा परिणाम; एअर इंडियाकडून इंधन अधिभारात बदल
जेट इंधन दरवाढीचा परिणाम; एअर इंडियाकडून इंधन अधिभारात बदल

जेट इंधन दरवाढीचा परिणाम; एअर इंडियाकडून इंधन अधिभारात बदल

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जागतिक स्तरावर जेट इंधनाच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी इंधन अधिभाराच्या रचनेत सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. ही नवी दररचना ८ एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात आली असून त्यामध्ये एअर इंडिया एक्सप्रेस च्या उड्डाणांचाही समावेश करण्यात आला आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या वाढत्या खर्चाचा परिणाम कमी करताना प्रवाशांवरील आर्थिक भार मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न या बदलांमागे आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार देशांतर्गत प्रवासासाठी अंतरावर आधारित अधिभार प्रणाली लागू करण्यात येत आहे.

यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार, विमान कंपन्यांनी खर्च आणि भाडे यामध्ये संतुलन राखत नवे अधिभार निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या बदलामुळे विमानप्रवासाच्या तिकिटांच्या दरांमध्ये काही प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता असून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना याची दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here