ठाणे जिल्हा परिषदेचा २०२६-२७ अर्थसंकल्प सादर; ग्रामीण विकास, पारदर्शकतेवर भर
ठाणे : सर्वांगीण ग्रामीण विकास, डिजिटल पारदर्शकता आणि सामाजिक सक्षमीकरणाला गती देणारा ठाणे जिल्हा परिषद चा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी बी. जे. हायस्कूल येथील सभागृहात हा अर्थसंकल्प मांडण्यात आला.
यावेळी सन २०२५-२६ या वर्षाचा सुधारित तसेच सन २०२६-२७ या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प सभागृहासमोर ठेवण्यात आला.
अर्थसंकल्पानुसार, २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण अंदाजपत्रकीय जमा ११६.९९ कोटी रुपये इतकी असून, एकूण खर्च ११६.९३ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. संतुलित आणि विकासाभिमुख असा हा अर्थसंकल्प असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, डिजिटल सेवा विस्तार आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध योजनांना प्राधान्य देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.