ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सहा महिला कैद्यांची पर्यावरणपूरक हस्तनिर्मित पॅचवर्क बॅग
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सहा महिला कैद्यांची पर्यावरणपूरक हस्तनिर्मित पॅचवर्क बॅग
ठाणे :
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सहा महिला कैद्यांनी कौशल्य, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरकतेचा सुंदर संगम साधत एक आकर्षक १०० टक्के हस्तनिर्मित पॅचवर्क बॅग तयार केली आहे. ‘प्रयास’च्या पुनर्वसन आणि कौशल्य-विकास उपक्रमाचा हा एक भाग आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिला कैद्यांना विविध व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्याची, सर्जनशीलतेला वाव देण्याची तसेच टिकाऊ आणि पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्याची संधी मिळत आहे. पॅचवर्क बॅग तयार करताना महिलांनी आपल्या कलाकौशल्याचा उपयोग करून उपयुक्त आणि आकर्षक उत्पादन साकारले.
प्रत्येक बॅग ही केवळ हस्तकौशल्य आणि सर्जनशीलतेचे प्रतीक नसून टिकाऊपणा, सन्मान आणि पुनर्वसन या मूल्यांचेही प्रतिबिंब आहे. अशा कौशल्य-विकास उपक्रमांमुळे महिला कैद्यांना आत्मविश्वास वाढविण्यासह भविष्यात स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत आहे.