ठाण्यात विंटेज व क्लासिक वाहनांच्या भव्य प्रदर्शनाला सुरुवात

0
17
ठाण्यात विंटेज व क्लासिक वाहनांच्या भव्य प्रदर्शनाला सुरुवात
ठाण्यात विंटेज व क्लासिक वाहनांच्या भव्य प्रदर्शनाला सुरुवात

ठाण्यात विंटेज व क्लासिक वाहनांच्या भव्य प्रदर्शनाला सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात विंटेज, क्लासिक कार, बाईक आणि स्कूटरप्रेमींसाठी खास अशा प्रदर्शनाची सुरुवात झाली आहे. हे आकर्षक प्रदर्शन १८ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून दररोज सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत नागरिकांना ते पाहण्यासाठी खुले असणार आहे.

हे प्रदर्शन ठाणे (पश्चिम) येथील पोखरण रोड क्रमांक २ वरील गावंड बाग परिसरात, कावेरी–रौनक पार्कजवळ असलेल्या ‘द क्रेव्ह ट्रक’ येथे भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध काळातील दुर्मिळ आणि जतन केलेली विंटेज व क्लासिक वाहने मांडण्यात आली असून वाहनप्रेमींमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले आहे.

ठाणेकर नागरिकांसह वाहनप्रेमींनी या अनोख्या प्रदर्शनाला भेट देऊन इतिहासातील वाहनसंपदेचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here