ठाण्यात ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान ‘वज्रेश्वरी महोत्सव’; महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन

0
12

टेंबेनाका येथील बी. जे. हायस्कूलमध्ये आयोजन; २५ हून अधिक महिला स्वयंसेवी गटांचा सहभाग

ठाणे :
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिला स्वयंसेवी गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ठाण्यात ‘वज्रेश्वरी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत टेंबेनाका येथील बी. जे. हायस्कूल येथे हा महोत्सव भरविण्यात आला आहे.
या महोत्सवात २५ हून अधिक महिला स्वयंसेवी गट सहभागी झाले असून, त्यांनी दिवाळीसाठी खास तयार केलेले विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ, आकर्षक गृहसजावटीच्या वस्तू आणि इतर घरगुती उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी मांडली आहेत.
महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळत आहे. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
ठाणेकर नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांच्या स्वावलंबनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here