तरंदळे धरणात उडी घेऊन तरुण-तरुणीची आत्महत्या; कणकवली तालुक्यात खळबळ

0
5
तरंदळे धरणात उडी घेऊन तरुण-तरुणीची आत्महत्या; कणकवली तालुक्यात खळबळ
तरंदळे धरणात उडी घेऊन तरुण-तरुणीची आत्महत्या; कणकवली तालुक्यात खळबळ

तरंदळे धरणात उडी घेऊन तरुण-तरुणीची आत्महत्या; कणकवली तालुक्यात खळबळ

कणकवली : तरंदळे येथील धरणात एका तरुण आणि तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उशिरा रात्री उघडकीस आली. या दोघांनीही इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संपूर्ण कणकवली तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाची ओळख सोहम कृष्णा चिंदरकर (वय २२, रा. कुंभारवाडी, कलमठ) अशी तर मृत युवतीची ओळख ईश्वरी दीपक राणे (वय १८, रा. बांधकरवाडी, कणकवली) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सोहमचा मोबाईल हरवला होता. हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी तो संध्याकाळी सुमारे ७ वाजता चुलत भावाच्या दुचाकीवरून घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.

दरम्यान, मोबाईल हरवल्यानंतर सोहमने आईचा मोबाईल वापरून ईश्वरीला व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्यात “आपण तरंदळे धरणावर जाऊया” असे लिहिले होते. हा संदेश कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने तरंदळे धरणाकडे धाव घेतली.

धरण परिसरात बॅटरीच्या सहाय्याने शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

या दोघांच्या मृत्यूमुळे कणकवली तालुक्यात शोककळा पसरली असून या आत्महत्येमागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here