तांत्रिक शिक्षण विभाग सीईटी २०२६ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई l प्रतिनिधी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी तांत्रिक शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या सीईटी २०२६ परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित परीक्षांच्या तारखा नोंदवून तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जाहीर वेळापत्रकानुसार एमएएच-एम.एचएमसीटी सीईटी २०२६ ही परीक्षा २५ मार्च २०२६ रोजी होणार आहे. एमएएच-एमसीए सीईटी २०२६ परीक्षा ३० मार्च २०२६, तर एमएएच-बी.डिझाईन सीईटी २०२६ परीक्षा ५ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. एमएएच-एमबीए/एमएमएस सीईटी २०२६ या परीक्षा ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहेत.
तसेच एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीएम) २०२६ परीक्षा ११ ते २० एप्रिल २०२६, तर एमएएच-एमएचटी सीईटी (पीसीबी) २०२६ परीक्षा २१ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. एमएएच-बी.एचएमसीटी/बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी-२०२६ ही परीक्षा २८ ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे.
याशिवाय द्वितीय प्रयत्नासाठीच्या परीक्षा देखील जाहीर करण्यात आल्या असून, एमबीए/एमएमएस सीईटी २०२६ ची परीक्षा ९ मे २०२६, एमएचटी सीईटी (पीसीबी) २०२६ १० ते ११ मे २०२६, तर एमएचटी सीईटी (पीसीएम) २०२६ १२ ते १६ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.


