तारकर्लीच्या जय मिटबावकर यांना पर्वतारोहणात ‘A’ ग्रेड; प्रतिष्ठित माउंटेनियर प्रमाणपत्र प्राप्त

0
61

मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्लीचा सुपुत्र जय मिटबावकर यांनी पर्वतारोहण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत प्रतिष्ठित माउंटेनियर प्रमाणपत्र (A ग्रेड) प्राप्त केले आहे. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मुळचा तारकर्ली (ता. मालवण) येथील असलेला जय सध्या मुंबईत वास्तव्यास असून त्यांनी के. जे. सोमय्या ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, विद्याविहार येथून बारावी कला शाखेचे शिक्षण पूर्ण केले आहे.
जयने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे असलेल्या प्रतिष्ठित Jawahar Institute of Mountaineering and Winter Sports (JIM&WS) संस्थेत आयोजित २४ दिवसांचा मूलभूत पर्वतारोहण अभ्यासक्रम (Basic Mountaineering Course – BMC-155) यशस्वीरित्या पूर्ण केला.
या प्रशिक्षणादरम्यान जयने कठीण पर्वतीय भूप्रदेश, बर्फाळ भाग आणि विविध साहसी आव्हानांचा यशस्वी सामना करत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीची दखल घेत संस्थेकडून.त्यांना प्रतिष्ठित ‘A’ ग्रेड प्रदान करण्यात आली.
यासोबतच संस्थेच्या कमांडिंग ऑफिसर यांच्या हस्ते त्यांना पर्वतारोहण क्षेत्रातील सन्मानाचे प्रतीक मानला जाणारा ‘आइस एक्स बॅज’ (Ice Axe Badge) देऊन गौरविण्यात आले. या यशामुळे जय यांना अधिकृतपणे माउंटेनियर म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे.
जय मिटबावकरच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग, मालवण आणि तारकर्ली परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून युवकांसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here