तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात तेंडोलीत अज्ञातांकडून बॅनर झळकला

0
38
तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात तेंडोलीत अज्ञातांकडून बॅनर झळकला
तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात तेंडोलीत अज्ञातांकडून बॅनर झळकला

तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात तेंडोलीत अज्ञातांकडून बॅनर झळकला

बॅनरवर रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था दर्शवणारी छायाचित्रेही झळकवण्यात आली आहेत

कुडाळ प्रतिनिधी-
कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्याला जोडणारा तसेच केळुस, आंदुर्ले पंचक्रोशीतील गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात तेंडोलीत अज्ञातांकडून ‘सावधान’ असा बॅनर झळकवण्यात आला असून, बुधवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. या बॅनरमधून प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बॅनरवर रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था दर्शवणारी छायाचित्रेही झळकवण्यात आली असून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

या बॅनर मध्ये असे केले आहे की, पुढील रस्ता वाहतुसाठी योग्य राहिलेला नाही. तरी येणा-या वाहन चालकांनी गाडी चालवताना सांभाळून चालवावी. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. गेली वीस वर्षे या रस्त्या काम रखडलेले आहे. निवडणूक जवळ आली की सर्वजण आश्वासन देऊन जातात पण निवडणूक झाल्यानंतर कोणीही या मागणी कडे लक्ष देत नाहीत. ग्रामस्थांनी वारंवार प्रस्ताव देऊनही या कडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे यापुढे येणाऱ्या निवडणूकांना मतदान करायचे की नाही हा प्रश्न आहे. हा रस्ता एका वाडी पुरता नसून तो कुडाळ- वेंगुर्ला मुख्य रस्त्याला तसेच दुसऱ्या बाजूने केळूस, आंदुर्ले अशा पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ता आहे. रस्ता खराब असल्याने बस वाहतूक होत नाही, त्यामुळे शाळेतील मुलांची गैरसोय होते. रोज या रस्त्याने ये जा करणे कठीण झाले आहे. शासनाला विनंती आहे की याकडे लक्ष द्यावे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने या रस्त्याचे काम राहीले आहे. लवकरात लवकर या कडे लक्ष देवून रस्त्याचे काम पूर्ण करावे, कारण येणाऱ्या पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे वाहून जाण्याची दाट शक्यता असून अतिशय बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. तरी या कडे लक्ष देवून रस्त्याचे काम सुरू करावे ही विनंती, असा आशय बॅनवर नमूद करण्यात आला असून त्याखाली आपले नम्र – एक मतदार दाता तेंडोली वरची आदोस, ता. कुडाळ असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हा बॅनर पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here