दशानेमा गुजर युवक संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन दातार वृद्धाश्रमात सेवाभावी उपक्रमांनी साजरा

0
13
दशानेमा गुजर युवक संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन दातार वृद्धाश्रमात सेवाभावी उपक्रमांनी साजरा
दशानेमा गुजर युवक संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन दातार वृद्धाश्रमात सेवाभावी उपक्रमांनी साजरा

दशानेमा गुजर युवक संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन दातार वृद्धाश्रमात सेवाभावी उपक्रमांनी साजरा

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली :
समाजसेवेचा वसा जपत दशानेमा गुजर युवक संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला दातार वृद्धाश्रम, दापोली येथे विविध सेवाभावी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही संस्थेने आपला वर्धापन दिन वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली.

या निमित्ताने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसह सर्व कर्मचारीवर्गासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तसेच दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. वृद्धाश्रमाला आवश्यक असलेल्या वस्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन संस्थेतर्फे १५ बेडशीट्स आणि १५ पिलो कव्हर्स भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, उपाध्यक्ष निकेत मेहता, सचिव मयुरेश शेठ, कार्याध्यक्ष ऋषिकेश तलाठी, खजिनदार स्वप्नील मेहता तसेच मेंटॉर्स अरुण गांधी, राहुल साबळे, आशिष मेहता, समीर गांधी आणि समीर तलाठी उपस्थित होते.
याशिवाय संस्थेचे संचालक सिद्धेश शेठ, परेश बुटाला, ओंकार तलाठी, आदित्य गांधी आणि सदस्य सीए ऋषिकेश शेठ, प्रा. तेजस मेहता, सोहम तलाठी, शिवम तलाठी, प्रणव तलाठी, अमित मेहता, पार्थ साबळे, ऋषिकेश मि. तलाठी, ओंकार मेहता, अथर्व मेहता, डॉ. अपूर्व मेहता, साहिल बुटाला, सार्थक बुटाला यांच्यासह संस्थेचे अन्य सदस्य उपस्थित होते. दातार वृद्धाश्रमाच्या वतीने धनंजय गोरे, हरेश पटेल, इंगळे काका तसेच वृद्धाश्रमातील कर्मचारीवर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान संस्थेचे सदस्य प्रा. तेजस मेहता यांनी संस्थेने गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचा आढावा सादर केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीचा सहवास लाभावा, त्यांच्याशी संवाद साधता यावा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी समाजातील तरुणाई त्यांच्या पाठीशी उभी आहे, याची जाणीव त्यांना व्हावी, या भावनेतून संस्था दरवर्षी आपला वर्धापन दिन वृद्धाश्रमात साजरा करण्याचा प्रयत्न करते. वर्धापन दिन हा केवळ आनंदोत्सव न राहता समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा एक प्रयत्न आहे.
यावेळी दातार वृद्धाश्रमाच्या वतीने इंगळे काका आणि श्री. धनंजय गोरे यांनी दशानेमा गुजर युवक संस्थेचे आभार मानले. संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
अत्यंत आनंदी, आपुलकीच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. संस्थेच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आयोजित या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here