दहावी-बारावीत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा सकल मराठा समाजातर्फे गौरव

0
32

सावंतवाडी:

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सकल मराठा समाज, सिंधुदुर्ग तर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिली.
सत्काराचे स्वरूप:
1. 70% पेक्षा जास्त गुण: सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव.
2. 90% पेक्षा जास्त गुण: शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव.
गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात:
शिकण्याची जिद्द असलेल्या परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या समाजातील 10 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतही दिली जाणार आहे.
सकल मराठा समाजातर्फे गेली पाच वर्षे हा उपक्रम मान्यवरांच्या हस्ते राबवला जात आहे.
नाव नोंदणी आवाहन:
दहावी-बारावी परीक्षेत 70% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदवावीत. नाव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव, मोबाईल नंबर व गुणपत्रिकेचा फोटो खालील नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करावा.
संपर्क: 8484827993 / 7972648781
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सत्कार समारंभाची तारीख व स्थळ कळवण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here