दापोलीच्या जयवंत नारायण चव्हाण यांचा ज्ञानाचा ठसा; बँको मॅग्झिन प्रश्नमंजूषा स्पर्धेत विजेतेपद

0
20

दापोली | प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त बँको मॅग्झिनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बँको सहकार जागृती प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये दापोलीतील प्रसिद्ध कवी तथा श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मर्या; दापोलीचे लिपिक श्री जयवंत नारायण चव्हाण यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विजेतेपद पटकावले आहे.
सहकार क्षेत्राबाबत जनजागृती आणि ज्ञानवृद्धी व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहकार क्षेत्राशी संबंधित दहा प्रश्न विचारण्यात आले होते. श्री चव्हाण यांनी दहाही प्रश्नांची अचूक उत्तरे देत आपले ज्ञान सिद्ध केले आणि स्पर्धेचे विजेते ठरले.
या स्पर्धेतील विजेत्यांना जुलै २०२६ चा ‘बँको’ द्विशतकी विशेषांक, विजेतेपदाचे प्रमाणपत्र तसेच विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
सहकार क्षेत्रात कार्यरत असण्याबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपल्या कवितांमुळे स्वतंत्र ओळख निर्माण करणारे जयवंत चव्हाण यांच्या या यशाबद्दल नागरिक, साहित्यप्रेमी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here