दापोली तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासकांची नियुक्ती!

0
4
दापोली तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासकांची नियुक्ती !
दापोली तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासकांची नियुक्ती !

दापोली तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासकांची नियुक्ती!

सहा महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली : दापोली तालुक्यातील फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आता ५६ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर या ग्रामपंचायतींच्या कारभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होईपर्यंत ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी ही प्रशासकीय नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आता लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांऐवजी नियुक्त प्रशासकांच्या माध्यमातून कारभार चालणार आहे.
प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये साखळोली, वाकवली, शिवाजीनगर-दापोली, आडे-खुर्द, आंजर्ले, सुकोंडी, कोळथरे, अडखळ, पालगड, जामगे, पिसई, मुगीज, विसापूर, आवाशी, शिरखल, मुर्डी, पांगारी तर्फे हवेली, पन्हाळेकाजी, उन्हवरे, शिरवणे, दाभिळ, चंद्रनगर, म्हाळुंगे, टांगर गणपतीपुळे, शिवाजीनगर सा. वडवली, शिरसोली, नवशी, बुरोंडी, ओणनवसे, भोपण, गुडघे-उटंबर-पणदेरी, ताडील, आसूद, पंचनदी, दाभोळ, वणौशी तर्फे पंचनदी, चिखलगाव, लाडघर, पाडले, गिम्हवणे, केळशी, हर्णे, मुरुड, आडे, आंबवली बु., कर्दे, असोंड-शिवनारी, पोफळवणे, टेटवली, मौजे दापोली आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
नियुक्त प्रशासकांकडून ग्रामपंचायतींचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज, विकासकामांशी संबंधित प्रक्रिया तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी पार पाडली जाणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन नवीन लोकनियुक्त पदाधिकारी सत्तेवर येईपर्यंत या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here