दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग
दिंडोरी l प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड गावास महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भेट दिली. स्वच्छ भारत मिशन (टप्पा २) अंतर्गत आयोजित श्रमदान स्वच्छता मोहिमेत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावासाठी नागरिकांचा सक्रीय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा शाल व रोप देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळेच गाव स्वच्छ व आरोग्यदायी राहते, असे गौरवोद्गार महामहिम राज्यपालांनी काढत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.


