‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव 2026’ चे उद्घाटन

0
13
‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव 2026’ चे उद्घाटन
‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव 2026’ चे उद्घाटन

‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव 2026’ चे उद्घाटन

मराठी चित्रपटांना राष्ट्रीय व्यासपीठ

नवी दिल्ली : मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव – 2026’ चे उद्घाटन खासदार Vinod Tawde यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचेही उद्घाटन करण्यात आले.
डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित उद्घाटन सोहळ्यास निवासी आयुक्त श्वेता सिंघल, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी खासदार विनोद तावडे यांनी मराठी साहित्य, नाटक आणि चित्रपटांचा भारतीय चित्रपटसृष्टीवर झालेला प्रभाव अधोरेखित केला. दिल्लीसह देशभरात मराठी कला, संस्कृती आणि साहित्याबद्दल मोठा आदर असल्याचे सांगत मराठी चित्रपट आणि नाट्यकृतींनी हिंदीसह विविध भारतीय भाषांतील चित्रपटांना प्रेरणा दिल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव’ नियमितपणे आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र सदनामध्ये वर्षभर दर महिन्याला एका शनिवारी मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन आणि चित्रपट रसास्वाद उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here