दिवेआगर समुद्र दुर्घटनेत आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
23
दिवेआगर समुद्र दुर्घटनेत आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू
दिवेआगर समुद्र दुर्घटनेत आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

दिवेआगर समुद्र दुर्घटनेत आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

रायगड :
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सहलीसाठी आलेल्या आळंदी येथील खासगी क्लासच्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १ ऑक्टोबर रोजी घडली. हे विद्यार्थी इयत्ता अकरावी-बारावीतील असून, सहलीसाठी आलेल्या ४८ जणांच्या गटाचा ते भाग होते. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांना पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधून काढण्यात आले.
या दुर्घटनेबद्दल मंत्री नितेश राणे यांनी दुःख व्यक्त करत मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या कोवळ्या जीवांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले.
या दुःखद प्रसंगी आपण विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ मिळावे आणि दिवंगत विद्यार्थ्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here