दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयासाठी पदनिर्मितीला मंजुरी; भरती प्रक्रियेचा मार्ग खुला

0
58

दोडामार्ग – 
दोडामार्ग तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 24 जून 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार उपजिल्हा रुग्णालयाच्या आकृतीबंधानुसार आवश्यक पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग आता खुला झाला आहे.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे रुग्णालय अधिक सुसज्ज स्वरूपात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या रुग्णालयामुळे तालुक्यातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असून मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे.
या मंजुरीसाठी आमदार दीपक केसरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून पदनिर्मितीची मागणी केली होती. शासनाच्या या निर्णयामुळे दोडामार्गच्या आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here