दोडामार्ग येथे नवरात्रोत्सवात महालक्ष्मी स्तोत्र व भवानी अष्टक पठण सोहळा उत्साहात

0
6
दोडामार्ग येथे नवरात्रोत्सवात महालक्ष्मी स्तोत्र व भवानी अष्टक पठण सोहळा उत्साहात
दोडामार्ग येथे नवरात्रोत्सवात महालक्ष्मी स्तोत्र व भवानी अष्टक पठण सोहळा उत्साहात

दोडामार्ग येथे नवरात्रोत्सवात महालक्ष्मी स्तोत्र व भवानी अष्टक पठण सोहळा उत्साहात

दोडामार्ग – प्रतिनिधी
श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज, दोडामार्ग यांच्या वतीने पद्मश्री विभूषित अध्यात्म शिरोमणी सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी यांच्या गुरुपीठारोहण रजतमहोत्सवी वर्षानिमित्त मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सार्वजनिक नवरात्रोत्सव, भेडशी–दोडामार्ग येथे सामूहिक महालक्ष्मी स्तोत्र व भवानी अष्टक पठण सोहळा उत्साहात पार पडला.
नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून आयोजित या धार्मिक कार्यक्रमात आदिशक्ती माँ दुर्गादेवीच्या चरणी सामूहिक स्तोत्रपठण करण्यात आले. भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला धार्मिक वातावरणाची जोड लाभली. भारतीय संस्कृतीतील स्तोत्रपठणाची परंपरा जपणे, मातृशक्तीचा सन्मान करणे तसेच सनातन धर्मातील आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार करणे हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश होता. धर्मशिक्षक कु. यश नाईक, संत समाज समितीचे पदाधिकारी आणि श्री रीनज पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक महालक्ष्मी स्तोत्र व भवानी अष्टक पठण सोहळा संपन्न झाला. सामूहिक पठणातून देवीच्या उपासनेबरोबरच समाजात भक्तिभाव, धार्मिक जागृती आणि सांस्कृतिक परंपरांविषयी आदर निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली संत समाजाच्या माध्यमातून विविध भागांत धर्मजागृती, संस्कारसंवर्धन आणि सामूहिक उपासनेचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वामीजींच्या गुरुपीठारोहण रजतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध धार्मिक उपक्रमांतून समाजात भक्ती, सद्भावना, संघटन आणि सांस्कृतिक जागृती वाढविण्यावर भर दिला जात आहे. या सामूहिक स्तोत्रपठणाच्या माध्यमातून विश्वशांती, समाजकल्याण, कुटुंबसौख्य आणि राष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. धार्मिक परंपरा आणि सामूहिक उपासनेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. प्रवीण सावंत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here