धक्कादायक! भोंदू अशोक खरातच्या कथित बेकायदा मंदिराला शासनाची कोटींची मदत?

0
105
धक्कादायक! भोंदू अशोक खरातच्या कथित बेकायदा मंदिराला शासनाची कोटींची मदत?
धक्कादायक! भोंदू अशोक खरातच्या कथित बेकायदा मंदिराला शासनाची कोटींची मदत?

धक्कादायक! भोंदू अशोक खरातच्या कथित बेकायदा मंदिराला शासनाची कोटींची मदत?

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर देवस्थानाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयावरून गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या निधीत २०१८ साली मंजूर करण्यात आलेल्या २५ लाख रुपयांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

या देवस्थानाशी संबंधित अशोक खरात यांच्यावर ‘भोंदूगिरी’चे आरोप होत असताना, अशा वादग्रस्त आणि कथित बेकायदा बांधकामासाठी शासनाकडून निधी मंजूर कसा झाला, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सदर बांधकाम प्रस्ताव शासनापर्यंत नेमका कसा पोहोचला? कोणत्या अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी त्यास मान्यता दिली? त्या वेळी संबंधित खात्याचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी कोण होते? तसेच या प्रकल्पाची कायदेशीर वैधता तपासली गेली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

जनतेच्या कररुपी पैशांचा वापर अशा प्रकारच्या वादग्रस्त प्रकल्पांसाठी केला जात असल्यास, यामागील जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, संबंधित विभागाकडून किंवा शासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य काय, हे समोर येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here