धामापूर तलाव परिसरात स्वच्छता अभियान !

0
12
धामापूर तलाव परिसरात स्वच्छता अभियान !
धामापूर तलाव परिसरात स्वच्छता अभियान !

धामापूर तलाव परिसरात स्वच्छता अभियान !

▪️वनविभागाच्या उपक्रमाचे होतेय कौतुक
आचरा- विवेक परब
वनपरीक्षेत्र कुडाळ अंतर्गत वनपरिमंडळ मालवण येथील नियतक्षेत्र धामापूर मधील मधील धामापुर तलाव येथे
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ६ जून रोजी उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा, सहायक वनसंरक्षक सावंतवाडी (खा.कु.तो.) डॉ.सुनील लाड व वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वछता मोहिम राबवण्यात आली. वनक्षेत्रातील प्लास्टिक आदी पर्यावरणास व वन्यजीवांस घातक कचरा गोळा करून साफसफाई करण्यात आली.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ चेतन पाटील, व सम्यंतक संस्थेचे सदस्य महंमद यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धन,जैवविविधतेचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी वनक्षेत्रपाल कुडाळ चेतन पाटील, ग्रामपंचायत धामापूर सरपंच श्रीम.परब मॅडम, उपसरपंच निवतकर, सम्यंतक संस्थेचे सभासद सदानंद परब, वनपाल मालवण अतुल खोत, वनरक्षक धामापूर, RRT पथक कुडाळ व मालवण चे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here