नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीतील घवघवीत यशाचा नवी मुंबईत भाजपकडून जल्लोष
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्याबद्दल नवी मुंबईत जल्लोष साजरा करण्यात आला. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून भाजपा राज्यात अव्वल पक्ष ठरला आहे.
या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी भाजपा नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे एकत्र आले होते. यावेळी जल्लोषात घोषणा, अभिनंदन आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे कोकण विभाग संवादक अभिजीत पेडणेकर, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस तसेच आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नेत्यांनी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीतील यश हे संघटनात्मक ताकदीचे फलित असल्याचे सांगितले. आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याहीपेक्षा मोठे यश मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
भाजपच्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष सज्ज असल्याचे चित्र दिसून आले.


