नवी मुंबईकरांसाठी मालमत्ता कर थकबाकीवर ‘अभय योजना’; विलंब शुल्कावर ५०% सूट
नवी मुंबई : मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी नवी मुंबई महानगरपालिका कडून विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदार नागरिकांना मालमत्ता कर भरताना विलंब शुल्कावर तब्बल ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.
नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित मालमत्ता कर वेळेत भरावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी लागू असून तिची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
थकबाकीदारांना मोठा दिलासा देणारी ही योजना असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी पुढाकार घेऊन आपली थकबाकी नियमित करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.