नवी मुंबईत ‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम; २१ एप्रिल रोजी महिला जनसुनावणी
नवी मुंबई : प्रतिनिधी
महिलांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महिला आयोग यांच्या वतीने “राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई येथे महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या जनसुनावणीत प्रलंबित तक्रारींसह थेट उपस्थित राहणाऱ्या महिलांच्या समस्यांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर स्वतः उपस्थित राहणार आहेत.
जनसुनावणीचा तपशील :
📅 दिनांक : २१ एप्रिल २०२६
⏰ वेळ : सकाळी १०.०० वाजता
📍 स्थळ : सिडको भवन, ७ वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई
दरम्यान, सर्व स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत या जनसुनावणीची माहिती पोहोचवावी. अधिकाधिक गरजू महिलांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात आणि त्यांचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


