नवी मुंबई अग्निशमन केंद्रांचे फोन बंद

0
35
नवी मुंबई अग्निशमन केंद्रांचे फोन बंद
नवी मुंबई अग्निशमन केंद्रांचे फोन बंद

नवी मुंबई अग्निशमन केंद्रांचे फोन बंद

नवी मुंबई l प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रांचा भोंगळ कारभार समोर आला असून केंद्रांचे दूरध्वनी क्रमांक वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोपरखैरणे (०२२-२७५४११०१) आणि ऐरोली (०२२-२७७९६६००) येथील अग्निशमन केंद्रांचे फोन अनेक दिवसांपासून बंद असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

सध्या वाढत्या उष्णतेमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना फोन न लागल्यामुळे नागरिकांना थेट अग्निशमन केंद्रात जाऊन तक्रार नोंदवावी लागत आहे. त्यामुळे मदत पोहोचण्यास विलंब होत असून संभाव्य हानी वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे.

याबाबत आयुक्तांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. “आयुक्त माहिती घेत नाहीत, मग महापौर तरी याची दखल घेणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, महानगरपालिकेने तात्काळ फोन सेवा सुरू करून आपत्कालीन यंत्रणा सुरळीत करावी, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या अग्निशमन सेवांमध्ये अशा प्रकारची निष्काळजीपणा होणे गंभीर बाब असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here