नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ रोजी पहिली विमानसेवा

0
349

सिडकोचे बहुप्रतिक्षित स्वप्न अखेर साकार होत असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ रोजी पहिली विमानसेवा सुरू होत आहे. पहिल्या दिवशी एकूण ३० एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स होणार असून इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांच्या सेवा उपलब्ध असतील.

पहिले आगमन इंडिगोचे 6E 460 विमान बेंगळुरूहून सकाळी ८.०० वाजता, तर पहिले प्रस्थान 6E 882 विमान हैदराबादकडे सकाळी ८.४० वाजता होणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हा क्षण नवी मुंबई, महाराष्ट्र आणि देशासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले.

या विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार असून नवी मुंबईसह पुणे, पनवेल, रायगड व कोकणातील नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here