नागपूर विमानतळ ‘ब्राऊनफिल्ड’ विमानतळ म्हणून विकसित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

0
10

नवी दिल्ली : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) या नागपूर विमानतळाच्या ‘ब्राऊनफिल्ड’ विकास प्रकल्पास मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे नागपूर विमानतळाचा विस्तार, आधुनिकीकरण आणि प्रवासी सुविधांमध्ये मोठी वाढ होणार असून विदर्भाच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे मानले जात आहे. वाढती प्रवासी संख्या, कार्गो वाहतूक आणि औद्योगिक गरजा लक्षात घेऊन विमानतळ अत्याधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहे.

‘ब्राऊनफिल्ड’ विकास अंतर्गत विद्यमान विमानतळाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार व सुधारणा करण्यात येते. या प्रकल्पामुळे नागपूरचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here