नेवरे गावाचे सरपंच दीपक फणसे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे मतदारसंघातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला.
यावेळी उदय सामंत यांनी दीपक फणसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेना परिवारात स्वागत केले. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाची ताकद तळागाळात आणखी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रवेश सोहळ्यात शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी, तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्या सहकाऱ्यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.