नौपाडा पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी

0
37
नौपाडा पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी
नौपाडा पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी

नौपाडा पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी

ठाणे l प्रतिनिधी

ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत नौपाडा पोलीस ठाण्याने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने हरवलेला मोबाईल फोन शोधून तो संबंधित मुळ मालकास परत करून नागरिक सेवेचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. गहाळ मोबाईलसंदर्भात नागरिकाने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांनी तांत्रिक साधनांचा वापर करून मोबाईलचा शोध घेतला.

सायबर व तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून मोबाईलचा मागोवा घेत त्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले. आवश्यक तपास व खातरजमा केल्यानंतर हा  मोबाईल सुरक्षितपणे तक्रारदार नागरिकाकडे सुपूर्द करण्यात आला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून, पोलिसांवरील विश्वास

अधिक दृढ झाला आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात येत असून, अशा कृतींमुळे ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना अधिक बळकट होत असल्याचे दिसून येत आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या प्रसंगी संबंधित नागरिकाने नौपाडा पोलीस ठाण्याचे तसेच ठाणे पोलिस आयुक्तालयाचे आभार मानत पोलिसांच्या तत्परता व सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here