पं. स. सदस्य दिपक सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम!

0
8

गावठणवाडी-पालकरवाडी वहाळावर श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

आचरा-विवेक परब
मालवण पंचायत समिती सदस्य, चिंदर गावचे माजी उपसरपंच श्री. दिपक सुर्वे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिंदर ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी गावठणवाडी-पालकरवाडी येथील वहाळावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

गावठणवाडी-पालकरवाडी वहाळावर श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग परिसरातील जलसाठा वाढविण्यासाठी व्हावा, तसेच भूजल पातळी सुधारण्यास मदत मिळावी, या उद्देशाने वनराई बंधारा उभारण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा देण्या पुरते मर्यादित न राहता श्रमदानातून समाजोपयोगी कार्य करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
या श्रमदान उपक्रमात पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे, सोसायटीचे चेअरमन देवेंद्र हडकर, चंद्रशेखर पालकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे,
प्रतिक्षा पालकर-माडये, माजी सभापती हिमाली अमरे, विश्राम माळगांवकर, रोहित पाटील, तुषार पवार, समीर अपराज, संतोष अपराज, सागर अपराज, शिशिर पालकर, गजानन पाटणकर, रणजित दत्तदास, योगेश चव्हाण, एकनाथ पवार, आत्माराम पालकर, सुभाष पालकर आदींनी सहभाग घेतला.
श्रमदानातून जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या चिंदर ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here