पश्चिम रेल्वेकडून तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी बॉडी कॅम तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक जॅकेट
पश्चिम रेल्वेकडून तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी बॉडी कॅम तंत्रज्ञानाचेअत्याधुनिक जॅकेट
मुंबई :
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी व्यावसायिक डिझाइन, वाढीव आराम आणि एकात्मिक बॉडी कॅम तंत्रज्ञानाचा मेळ साधणारे नवीन जॅकेट सादर केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिकीट तपासणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांना अधिक आरामदायी आणि व्यावसायिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने या जॅकेटची रचना करण्यात आली आहे. जॅकेटमध्ये एकात्मिक बॉडी कॅम तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आल्याने तिकीट तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता वाढविण्यास मदत होणार आहे.
‘कर्तव्यासाठी बनवलेले, पारदर्शकतेसाठी डिझाइन केलेले’ या संकल्पनेवर आधारित हे नवीन जॅकेट तिकीट तपासणी सेवेला अधिक स्मार्ट आणि आधुनिक स्वरूप देण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाकडून तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने हे नवे जॅकेट सादर करण्यात आले आहे.