पाबळ ग्रामस्थांचे श्रमदानातून दोन वनराई बंधारे; पाणीपातळीत वाढ 

0
11
 पाबळ ग्रामस्थांचे श्रमदानातून दोन वनराई बंधारे; पाणीपातळीत वाढ 
 पाबळ ग्रामस्थांचे श्रमदानातून दोन वनराई बंधारे; पाणीपातळीत वाढ 

 पाबळ ग्रामस्थांचे श्रमदानातून दोन वनराई बंधारे; पाणीपातळीत वाढ 

पेण :
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून साकारत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाबळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून दोन वनराई बंधारे उभारले आहेत. ग्रामस्थांच्या एकजुटीतून उभारलेल्या या बंधाऱ्यांमुळे गावातील पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

 पाबळ ग्रामस्थांचे श्रमदानातून दोन वनराई बंधारे; पाणीपातळीत वाढ 
पाबळ ग्रामस्थांचे श्रमदानातून दोन वनराई बंधारे; पाणीपातळीत वाढ
गावातील जलसाठा वाढविणे आणि पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे या उद्देशाने ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून हे काम पूर्ण केले. या उपक्रमामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर सामूहिक प्रयत्न किती महत्त्वाचे ठरू शकतात, हे अधोरेखित झाले आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि सामूहिक श्रमदानातून जलसमृद्धी साधता येते, याचा पाबळ गावाने आदर्श घालून दिला आहे. पाणी संवर्धनासाठी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची गरज या कामातून पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here