पालघरच्या जव्हारमध्ये मत्स्यशेती व्यवस्थापनावर एकदिवसीय कार्यशाळा; ८७ शेततळेधारक शेतकऱ्यांचा सहभाग
जव्हार (पालघर) :
सेवा संकल्प अभियानांतर्गत तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, वांद्रे (पूर्व), मुंबई यांच्या वतीने आणि टाटा मोटर्सच्या आर्थिक सहकार्याने जव्हार येथील बायफ संस्थेच्या कॅम्पसमध्ये ‘मत्स्यशेती : पूर्वतयारी आणि बीज साठवणुकीनंतरचे व्यवस्थापन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न झाली.



