पाली तालुक्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन; कृषि विज्ञान केंद्र रोहाचा उपक्रम

0
5
पाली तालुक्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन
पाली तालुक्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन

पाली तालुक्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन; कृषि विज्ञान केंद्र रोहाचा उपक्रम

पाली | प्रतिनिधी
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत पाली तालुक्यातील मजरे जांभुळपाडा व ठाणाळे येथे नैसर्गिक शेती शाळेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अधिनस्त कृषि विज्ञान केंद्र रोहा, रायगडचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची गरज, विविध निविष्ठांची निर्मिती, उपलब्ध संधी तसेच आव्हाने याविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.

पाली तालुक्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन

७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सत्रात मजरे जांभुळपाडा येथे तर दुपारच्या सत्रात ठाणाळे येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ३० ते ३५ लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. तलाठी यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन ताकृअ पालीच्या कदम मॅडम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यशस्वी आयोजनासाठी सुपरवायझर श्री. आव्हाड, असिस्टंट श्री. भोसले तसेच श्री. गलांडे व श्री. शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here