पिंगुळी अपघातात गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू
कुडाळ :
पिंगुळी-पाट मुख्य रस्त्यावर पिंगुली- भूपकरवाडी येथे उभ्या कारला पाट मोटारसायकलने जोराची धडक दिल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली होती. यात मोटारसायकलच्या मागे बसलेला जयेश गोविंद नाईक (20, रा. माणगाव-डोबेवाडी) हा गंभीर जखमी झाला होता.
कुडालात ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे हलविले होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा त्याचे निधन झाले. या अपघातात मोटारसायकलस्वार संकेत श्रावण धुरी (20, रा. माणगांव-बेनवाडी) हा सुद्धा जखमी झाला असून त्याच्याकर सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जयेश व संकेत हे पाट येथील राज्यस्तरीय कबड़ी स्थर्या पाहून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. याबाबतची फिर्याद कारमालक गोविंद दाजी बावलेकर (रा. पिंगुळी गुढीपूर) यानी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
गोविंद बायलेकर हे पिंगुली-भूपकरवाडी येथे भाड्याने राहतात. त्यानी आपली कार पिंगुळी-पाट रसाच्या बाजूला पार्क केली होती. संकेत घुरी व जयेश नाईक रविवारी सायंकाळी मोटारसायकलने पाट येणे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गेले होते. मध्यरात्री 2 वा. च्या सुमारास ते दोघे मोटारसायकलने परत माणगाव येथे घरी परतत होते.
संवेश बुरी मोटारसायक्कल चालवित होता, त्याचे
मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि मोटरसायकल भूनकरवाडी येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या कारला महकली, या धडकेत मोटारसायकलच्या मागे बसलेला जयेश नाईक कारच्या बोनेटवर आदळून नतर जमिनीवर कोसळला, यात तो गंभीर जखमी झाला, तर संकेत यालाही दुखापत झाली.
दोघांवरही प्रथम कुलाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी जयेश याला अधिक उपचारासाठी बांबौली-गोवा देथे हलविण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी रात्री उशित त्याचे निधन झाले. संकेत वाला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात कार व मोटारसायकल या दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. कुचाक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला


