पुणे जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ₹१,४७२ कोटींची तरतूद; विकासकामांना गती

0
22
पुणे जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ₹१,४७२ कोटींची तरतूद; विकासकामांना गती

पुणे जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ₹१,४७२ कोटींची तरतूद; विकासकामांना गती

News :
Pune District च्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ₹१,४७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये ₹९३ कोटींची वाढ करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना यंदाच्या नियोजनात विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या.

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil), कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्यासह खासदार आणि आमदार सहभागी झाले होते.

बैठकीत सन २०२५-२६ मधील निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या नियोजनाला मंजुरी देण्यात आली. जिल्ह्याच्या वाढत्या विकासाच्या गरजा लक्षात घेऊन निधी वाढ, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी आणि विकासकामांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here