पुणे नवरात्रौ महोत्सव २०२६ चे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन; मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

0
12

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ; विविध क्षेत्रांतील मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे :
पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आणि यंदा ३२ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ‘पुणे नवरात्रौ महोत्सव २०२६’चा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या महोत्सवाचे भव्य उद्घाटन करण्यात आले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
विविध क्षेत्रांतील मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
या सोहळ्याला माजी आमदार उल्हासदादा पवार, डॉ. नीलमताई गोऱ्हे, माजी उपमहापौर आबा बागुल आणि युवा नेते हेमंत बागुल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. पुण्याची सांस्कृतिक आणि कलात्मक परंपरा जपण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत ती पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा महोत्सवांना विशेष महत्त्व आहे.
श्री लक्ष्मीमातेच्या आशीर्वादाने पुण्याची सांस्कृतिक परंपरा अशीच समृद्ध होत राहो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या पुणेकर आणि कलाप्रेमी भाविकांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here